ABOUT GREEEN BAPPA

Let us have a new mission this year. Let us bring ‘Green Bappa’ to our house this year. Then let us bring ‘Green Bappa’ to our house and let us celebrate eco- friendly Ganesh Festival. Our Ganesh statue is prepared from red soil, cow-dung and paper garbage. You will be given a plant of Bael or hibiscus along with the idol of Bappa. Immersion of Bappa will be done at home by planting a plant in a pot.God bless you. This way, our ‘Green Bappa’ concept can be realized. Currently, plaster of Paris largely endangers our environment. Therefore the concept of Green Bappa- eco friendly Ganesh has emerged. We take this mission of ‘Green Bappa’ for this year with cooperation from all of you. We expect that you will surely welcome this concept. Wish you all a very happy ‘Go Green Bappa’ festival.

ग्रीन बाप्पा आणूया

यावर्षी एक नवीन संकल्प करूया, आपल्या घरी ग्रीन बाप्पा आणूया. चला तर मग यावर्षी आपल्या घरी “ग्रीन बाप्पा” ची प्राणप्रतिष्ठापना करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया. आमच्या कडे बाप्पाची मूर्ती ही लाल माती, शेणखत व कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आली आहे. बाप्पाच्या मूर्तीसह आपणास बेलाचे किंवा जास्वंदाचे रोप देण्यात येईल.बाप्पाचे विसर्जन आपण घरच्याघरीच करून मूर्तीसह देण्यात आलेले रोप कुंडीत लावून सदैव आपणास बाप्पारूपी आशिर्वाद मिळेल.. यातूनच आमची “ग्रीन बाप्पा” संकल्पना साध्य होईल. सध्या आपल्या पर्यावरणास प्लास्टर ऑफ पॅरिस चा फार मोठा धोका निर्माण होत आहे. यातूनच पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणपूरक बाप्पा ही संकल्पना निर्माण झाली. आपल्या सर्वांच्या सहकार्याने यावर्षीपासून “गो ग्रीन बाप्पा” हा आमचा संकल्प आहे. आपण या संकल्पनेचे नक्कीच स्वागत कराल, हीच अपेक्षा. आपणा सर्वांना “गो ग्रीन बाप्पा” गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा