यावर्षी एक नवीन संकल्प करूया, आपल्या घरी ग्रीन बाप्पा आणूया. चला तर मग यावर्षी आपल्या घरी "ग्रीन बाप्पा" ची प्राणप्रतिष्ठापना करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया. आमच्या कडे बाप्पाची मूर्ती ही लाल माती, शेणखत व कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आली आहे. बाप्पाच्या मूर्तीसह आपणास फळभाज्यांच्या बिया देण्यात येत आहेत. बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन आपण घराच्याघरीच करून मूर्तीसह देण्यात आलेल्या बिया कुंडीत टाकून त्यातून आपणास बाप्पारूपी रोप तयार होईल. यातूनच आमची "ग्रीन बाप्पा" संकल्पना साध्य होईल. सध्या आपल्या पर्यावरणास प्लास्टर ऑफ पॅरिस चा फार मोठा धोका निर्माण होत आहे. यातूनच पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणपूरक बाप्पा ही संकल्पना निर्माण झाली. आपल्या सर्वांच्या सहकार्याने यावर्षीपासून "गो ग्रीन बाप्पा" हा आमचा संकल्प आहे. आपण या संकल्पनेचे नक्कीच स्वागत कराल, हीच अपेक्षा. आपणा सर्वांना "गो ग्रीन बाप्पा" गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

Bank Details

Account Number :- 60302368099
IFSC :- MAHB0000110
MICR :- 400014074
Branch :- Bank of Maharashtra Naupada Thane